सोलापूर : पोलिसांना चकवा देत कर्नाटक राज्यातील चडचण इथल्या आरोपीने सिव्हील हॉस्पीटल ए ब्लॉकच्या पाठीमागे मेल वार्डातून पलायन केले. ही घटना २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
मोदीनसाब सरदारसाब शेख, वय २२ राहणार पाटील नगर, हबीना चौक, चडचण कर्नाटक असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस शिपाई प्रथमेश ज्ञानेश्वर काळेल नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे मेल वॉर्ड मध्ये कर्तव्यावर असताना व मेल वॉर्ड मध्ये अॅडमिट असलेले तीन आरोपी यांचे आधार कार्ड नसल्याचे तेथील नर्स यांनी वार्डाचे बाहेरील काऊटर जवळ बोलावून घेतल्याने फिर्यादी तेथे गेले असता त्याच दरम्यान बेड क्र २५ वरील आरोपी मोदीनसाब सरदारसाब शेख हा फिर्यादीची नजर चुकवून त्याचे हातास लावलेली बेडीतून हात काढून कायदेशीर रखवालीतून पळून गेला आहे . पोलीस आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोट मध्ये तपास पोसई वाघमारे यांच्याकडे दिल्याचे दिसून आले,
या प्रकरणाची अधिक माहिती फौजदार वाघमारे यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती दिली नाही. मुळात हा तपास माझ्याकडे नाही क्षीरसागर नावाच्या अधिकाऱ्याकडे आहे असे सांगितले त्याचबरोबर सदर बजार पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार यांना फोनवरून माहिती विचारली असता तिथूनही अधिक माहिती देण्यास टाळाटाळ दिसून आली.
















