सोलापूर : पंचायत समिती दक्षिण सोलापूरयेथे सविधान प्रास्ताविकेचे प्रतिज्ञा पूर्वक वाचन करण्यात आले. याप्रसंगी सभापती सोनाली प्रशांत कडते उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समिती सदस्य धनेश अचालारे, एम.डी कमळे, शशिकांत दुपारगुडे, ताराबाई पाटील, रेखा नवगिरे , श्रीशैल्य नरोळे,संदीप टेळे,शारदाबाई दिंडोरे, शालुबाई चव्हाण, निर्मला राठोड, गटविकास अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकेचे वाचन गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व खातेप्रमुख सर्व कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज तर आभारप्रदर्शन अप्पाराव गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय कोळी, सुरेश गंगदे ,सुरज ओहाळ आदींनी परिश्रम घेतले.


















