सोलापूर परिवहन समितीचे माजी सदस्य, एम.के.फाउंडेशनचे संचालक,पूर्व भागातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, भैरण्णा भैरामडी यांच्या धर्मपत्नी ललिताबाई भैरण्णा भैरामडी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ५२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
रविवार दि २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


















