मोहोळ : सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मौजे सावळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते सखाराम साठे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. यावेळी डोंगरे दादांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन कार्यक्रमाच्या स्टेज वर येऊन राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते युवा उद्योजक बबलू पठान, सलमान आत्तार, सलीम आतार, शब्बीर पठान, आशिफ तांबोळी, फिरोज मनियार, रमजान सय्यद, अहमद पठान, समिर अत्तार, समिर पठान, इस्माईल मनियार, अमिर तांबोळी, सद्दाम तांबोळी, युवराज पेठे, समाधान लवटे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला .
यावेळी युवा नेते अक्षय खताळ, सयाजी गावडे ,युवा उद्योजक बबलू पठाण ,सयाजी सोनटक्के , सिद्राम पवार, लक्ष्मण वाघमोडे, दादाराव लांडगे ,युवराज ढेरे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, नागेश निळ, नितीन सोनटक्के, श्रीकांत टेकाळे, राजू टेकाळे, पप्पू गावडे, प्रवीण टेकाळे, आनंद गावडे, ज्ञानेश्वर लांडगे, शिवाजी काकडे, प्रवीण टेकाळे, आनंद गावडे, रफिक तांबोळी, वैजनाथ केदार, भीमराव चव्हाण आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात सभापती डोंगरे यांनी मनोहर भाऊंच्या विचार धारेवरच कार्य सुरू असून डोंगरे परिवार व लोकशक्ती परिवार कायमच मूळ तालुक्याच्या विकासासाठी व कटिबद्ध आहे त्यामुळे ही सोबत कायम ठेवा असे आवाहन केले….


















