सोलापूर : मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत वाघोली- वाघोलीवाडी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ तसेच कै.धनराज पतंगे प्रतिष्ठान आयोजित हापस्पीच क्रिकेट स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे Vijayraj Dongare यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे, वाघोलीचे सरपंच रामचंद्र पतंगे, सोलापूर जिल्हा भाजप उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पवार, पत्रकार सुहास घोडके, शेजबाभुळगाव सरपंच दीपक गवळी, उद्योजक सादिक तांबोळी, युवा नेते बाबासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते हरिभाऊ काकडे, कामती खुर्दचे सरपंच संजय पाटील, माजी सरपंच बंडू सरवळे, सय्यद वरवडेचे सरपंच अमर पोकळे, भाजप युवा मोर्चाचे विकास वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी
१) वाघोली येथे नूतन अंगणवाडी इमारत बांधणे.
२) वाघोली येथे भूमिगत गटार बांधणे.
३) वाघोली गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे.
४) वाघोली येथील मागासवर्गीय वस्तीत रस्ते दुरुस्ती करणे.
५) वाघोली व वाघोलीवाडी अंतर्गत 4 जिल्हा परिषद शाळांमध्ये हँडवॉश स्टेशन तयार करणे.
६) वाघोली व वाघोलीवाडी अंतर्गत 4 जिल्हा परिषद शाळा व सर्व अंगणवाड्यांमध्ये जलपुनर्भरणासाठी शोषखड्डे तयार करणे.
७) वाघोलीवाडी येथे नवीन नळ जोडणी करून पाणीपुरवठा सुविधा करणे.
८) वाघोली ते जामगाव रस्ता डांबरीकरण करणे. या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाला वाघोली सरपंच उर्मिला वाघमारे उपसरपंच तानाजी पवार ग्रामपंचायत सदस्य वसंत हरणे आनंदा वाघमारे नितीन पाटील संगीता कोळेकर सीमा चंदनशिवे मंगेश गावडे जयश्री गावडे भावना शिवशेट्टी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती आगामी िल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशक्ती परिवाराचे नेते अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी मोहोळ तालुक्यात कामांचा विकास सपाटा सुरू केला आहे. या विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारचे रणसिंग फुंकल्याची चर्चा आहे.


















