सोलापूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने १०५ युवकांचेरक्तदान झाले.विशेष म्हणजे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार कुणाल राऊत यांनी स्वतः रक्तदान केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे व पदाधिकारी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कॉंग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्द्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व युवक कॉंग्रेस संघटनात्मक निवडणूकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार कुणाल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी स्वतः रक्तदान करून युवकांना प्रोत्साहन दिले तसेच या शिबिरात १०५ युवकांनी रक्तदान केले.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, प्रदेश चिटणीस किसन मेकाले , महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश पदाधिकारी नितीन शिवशरण, जुबेर कुरेशी, अर्जुन साळवे, वाहिद बिजापुरे, महेश जोकारे, महेश लोंढे, योगेश मार्गम, आरिफ पठाण, ओमकार गायकवाड, राजासाब शेख, यल्लप्पा तूपदोळकर, प्रतीक आबुटे, तिरुपती परकीपंडला, शरद गुमटे, बाबुराव क्षीरसागर, संजय वाघमारे, गणेश वाघमारे, सागर राठोड, शाहू सलगर, आकाश गायकवाड, सुनील सारंगी, विवेक इंगळे, यासीन शेख, आनंद भंडारे, मल्लू म्हेत्रे, सचिन मानवी, नागसेन बंगाळे, क्षीरसागर, धीरज खंदारे, हरीश गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे,महेश सपाटे, शिवराज कोरे, निखिल पवार, सौरभ साळुंखे, सौरभ तुळसे यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी सहकार्य केले.


















