सोलापूर : महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहेत. पक्षांतर्गत युवकांचे हे एकप्रकारचे युद्धच म्हणावे लागेल. पूर्वी नेत्यांच्या नेमणुकीवर निवडी केल्या जायच्या मात्र आता लोकशाही रुजवण्यासाठी युवा कार्यकर्त्यांमधून मतदान घेऊन या निवडी केल्या जात आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच व चुरस निर्माण झाली आहे. शिवराज मोरे, कुणाल नितीन राऊत, शरण बसवराज पाटील, अनिकेत म्हात्रे, विजयसिंह चोधरी हि नावे चर्चेत आहेत.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात युवा कार्यकर्त्यांना कुणाल राऊत आणि प्रणव पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कुणाल राऊत यांचा सोलापूर दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांची जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेतली, त्यांना आमदार शिंदेंनी शुभेच्छा दिल्या,
पुढे शासकीय विश्रामगृहात वीज प्रश्नी शेतकरी व नागरिकांना भेटून निवेदन स्वीकारले, अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
शहर युवक अध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश डोंगरे यांच्या निवासस्थानी भेट दिली, तिथे डोंगरे परिवाराने स्वागत केले, पुढे काँग्रेस भवनात युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भेट देऊन राऊत यांनी रक्तदान केले,
अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौरव खरात यांनी राऊत यांना भगवान बुद्धांची प्रतिमा भेट दिली. त्यानंतर कुणाल राऊत यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली, म्हेत्रे यांनी राऊत यांना शुभेच्छा देत युवकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर शास्त्री नगरातील जेबी ग्रुपच्या कार्यालयात भेट दिली पुढे जी एम मागासवर्गीय संस्थेच्या कार्यालयात बाळासाहेब वाघमारे यांची भेट घेतली .


















