सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये महेश कोठे यांनी काँग्रेसला धक्का देत ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला त्याच बरोबर लगेच काही वेळाने दुसरा धक्का देत माजी महापौर यू एन बेरिया यांनीह काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीशी घरोबा केला
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात महेश कोठे यांनी सुधीर खरटमल यांना राष्ट्रवादीमध्ये घेत काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्याच वेळी खरटमल यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आ. प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी खरटमल यांच्या सुमारे 200 समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये शहर मध्यमधील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
यावेळी बोलताना कोठे म्हणाले, कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे निष्ठावंतान्वर अन्याय होत आहे खरटमल यांच्यावरही काँग्रेस पक्षाने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खरटमल ज्याप्रमाणे तुम्हाला काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक देत होते, त्याचप्रमाणे तुम्हाला राष्ट्रवादीतही वागणूक मिळेल असा विश्वास यावेळी कोठे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सुधीर खरटमल यांचेही भाषण झाले. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे, नगर सेवक तौफीक शेख, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, लता ढेरे, अजमल शेख, काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद शिकलकर, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, उपाध्यक्ष सोपान थोरात, सोलापूर महानगरपालिका माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठल होनमारे, सूर्यकांत शेरखाने, , मौला चॉंदा, प्रभाकर सोनगीवाले, वैभव वाडे, तन्वीर मणियार, स्वप्निल गायकवाड, अन्वर बागवान, काँग्रेसचे सचिव द्वारकाप्रसाद तावनिया, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड, मोची समाजाचे रथोत्सव अध्यक्ष प्रवीण वाडे, काँग्रेसच्या महिला प्रभाग अध्यक्ष सुनंदा होटकर, युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष युवराज पंतुवाले, सागर होटकर, निलेश होटकर, कृष्णा धुळराव, राजू कोरे, हिमाद शेख, रवींद्र शिंदे, अण्णा पवार, करेप्पा जंगम, सनी मेह्त्रे, गौरव पात्रे अशोक आयगोळे, वनिता गिरी, मंजू चव्हाण, प्रीती बंतल, समीरा शेख, परवीन सिंदगीकर, कांचन पवार, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला.


















