सोलापूर : माजी पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी बोलताना महापालिकेत भाजपची सत्ता असून झेडपी मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता असल्याचे सांगितले. निश्चित जिल्हा परिषदेत भाजपच्या पाठिंब्यावर सता मिळवली, भाजपचेच वर्चस्व जिल्हा परिषदेवर आहे.
आमदार सुभाष देशमुख हे भाजपचे मोठे नेते आहेत, राज्याचे माजी सहकार मंत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हा परिषदेत महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेला कोणताही मोठा अधिकारी नव्हता, केवळ दक्षिण पंचायत समितीचे बीडीओ उपस्थित होते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, इतर सभापती किंवा सदस्य कुणी नव्हते, केवळ दक्षिण तालुक्याच्या सभापती सोनाली कडते याच उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला कुणीच पदाधिकारी, मुख्य अधिकारी नसल्याचे पाहून बापूंच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. दक्षिण पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी पदाधिकारी, दक्षिणचे सदस्य अथवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलेच नव्हते का? असा ही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषदेत होते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष धोत्रे होते हे सर्व झेडपीत असताना कार्यक्रमाला मात्र कुणीच नव्हते, छोट्याशा पतसंस्थेच्या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी सदस्य आणि अधिकारी खुर्च्या कमी असतानाही उपस्थित राहतात. जिल्ह्याचा एवढा मोठा नेता जिल्हा परिषदेत असतानाही कुणी नसणे हे भाजपला न शोभणारे होते.


















