सोलापुर शहर काँग्रेस सेवादल – यंग ब्रिगेडच्या प्रभाग ०१ मड्डी वस्ती शाखा कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सेवादल उत्तरचे अध्यक्ष चंद्रकांत टिक्के, सेवादल शहर उपाध्यक्ष जब्बार शेख, सेवादल शहर सचिव हणमंतु रूपनर यांनी केले होते.
यावेळी सोलापुर शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या नूतन पदाधिकारी म्हणून पवन हजारे, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, रफीक लष्करी, मोईन शेख, आरिफ शेख, शहानवाज भुसनुर, अनवर शेख, नबीरसुल मुर्गानुर, अवधूत तरगे, श्रीशैल हुंडेक़री, अंकुश खंडोजी, आरिफ अंसारी, यासीन कोतींबिरे, ताज भुसनुर, अल्लाउद्दीन इनामदार यांची निवड करून त्यांच्ये निवडीचे पत्र हि देण्यात आले.
यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या सेवादल कार्यालयाचे उद्घाटन झाले येथील पदाधिकारी चंद्रकांत टिक्के, हणमंतु रूपनर, जब्बारभाई शेख आणि सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देते या सर्वांनी जनतेची सेवा करावी, त्यांचा अडचणी सोडवाव्या. सध्या देशात जातिपातीचा वापर करून भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. त्यांना चपराक लावणे गरजेचे आहे. जनता जनार्दन हे मालक आहेत कोणत्या मोदींची हुक़ूमशाही आम्ही चालू देणार नाही. भाजपवाल्यांना खरेच देशप्रेम असेल तर महागाई, बेरोजगारी, जनतेच्या विषयावर बोलावे पण जनतेचे प्रश्न सोडून सर्व विषयावर बोलतात. हे लोक कट्टरतेची भाषा बोलतात त्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. आज देशाला सर्वधर्मसमभावाच्या विचारांची गरज आहे. शहर उत्तर हा सुशीलकुमार शिंदे साहेबांचा जुना मतदारसंघ त्यामुळे माझ्यासाठी नवीन नाही. भाजपवाल्यांनी शहराची वाट लावली असून कनेक्शन नसतानाही पाणीपट्टी वसूल करत आहेत. त्यांना त्यांची जागा मतदानाच्या माध्यमातून दाखवून दया. आगामी निवडणुकीत शहर उत्तर मध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.
यावेळी सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, सेवादल यंग ब्रिगेड शहर अध्यक्ष विवेक कन्ना, संयोजक चंद्रकांत टिक्के, जब्बार शेख, हणमंतु रूपनर, सेवादल प्रदेश सचिव अशोक कलशेट्टी, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, रोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, नूर अहमद नालवार, रेखा बिनेकर, अरुणा डावरे, भोसले मैडम, राजाभाऊ महाडिक, नामदेव मुधोळकर, अर्जून पांढरे, जगन्नाथ बंडगर, शिवयोगी देवणगाव, श्रीशैल हुंडेकरी, इमाम मुर्गानुर, विट्ठल निंबाळकर, लाडले मशाक मुल्ला, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, रवि हुंडेक़री, सुधीर सोनकर, शहानवाज शेख, अकलाख दलाल, बसवराज रूपनर, अवधूत तरंगे, सिद्धाराम मोटे, विजय रूपनर, दरयाप्पा मोटे, प्रकाश काळे, प्रकाश धायगुड़े, रामु खांडेकर, यल्लाप्पा हुंडेक़री, रफीक लष्करी, चिदानंद खांडेकर, राजू नदाफ, रेवन मोटे, बसवराज जमादार, भिमाशंकर दुधाळ, महमंद मुजावर, उदंड दूधाळ, अशोक कोळी, अंकुश खंडोळी, शरीफाबी कोतींबिरे, डावरे मैडम महिबीबी शेख, मनीषा भोसले, निर्मला सोनकर, सीमा शेख, आयेशा शेख, रुखसाना शेख, कुसुमबी शेख, बिस्मिला शेख यांच्यासह या भागातील नागरिक बंधु भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.