सोलापूर : शेळगी मित्र नगर ते दहिटणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका नाल्यात जन्मलेल्या बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
शेळगी तील मित्र नगर कडून दहिटणे गावाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर डायमंड फंक्शन हॉल आहे, त्याच्या जवळ एक सांडपाणी नाला असून त्या नाल्यात कुत्रे काही तरी खात असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले, नागरिकांनी पाहिले असता मृत अवस्थेत असलेल्या जन्मजात अर्भकांचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी त्वरित ही माहिती जोडभावी पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी पाहिले असता स्त्री जातीचे अर्भक होते, कुणीतरी कॅरीबॅग मध्ये हे अर्भक नाल्यात फेकून दिले होते. ते शवविच्छेदन साठी पोलिसांनी सिव्हील हॉस्पिटलला पाठवले.


















