Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विणकर बागेच्या समस्यांचे आनंद गोसकींकडून निवेदन | उपायुक्त धनराज पांडे यांनी केली विणकर बागेची तातडीने पाहणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरातील पूर्व भागात ऑक्सीजन पार्क म्हणून कालपर्यंत गणली जाणारी विणकर बाग, नव्याने कारण ‘वेगळी’ च ओळख धारण करीत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेने विणकर बागेला संरक्षक भिंत आणि मजबूत प्रवेशद्वार बांधावे या मागणीसाठी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांनी महानगरपालिकेत निवेदन दिले. त्या निवेदनाची दखल मनपा उप-आयुक्त धनराज पांडे यांनी विणकर बागेला तात्काळ भेट देऊन नागरी अडचणींसंदर्भात पाहणी करून त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.

पूर्व भागातील विणकर बागेत सकाळी-सायंकाळी नागरिक आणि बालगोपाळाचा वावर असतो. अनेक नागरिक मार्निंग वाॅकच्या निमित्ताने नियमितपणे विणकर बागेत येत असतात. त्या बागेत विणकर यांचा पुतळा असून त्याचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे, मात्र त्या पुतळ्यास संरक्षक कठडा नसल्यामुळे पुतळा परिसरात लहान मुलांचा मुक्त संचार असतो. त्याचवेळी रात्री मद्यपींची गर्दी वाढत असल्याची चिंताजनक बाबही निदर्शनास आल्याने समाजसेवक आनंद गोसकी यांनी या बागेचे पावित्र्य कायम राखले जावे, या भावनेतून विणकर बागेत असलेल्या समस्या, एका निवेदनाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या.

जनआधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांनी, विणकर बागेस मजबूत संरक्षक भिंत, भव्य प्रवेशद्वार आणि विणकर पुतळ्या भोवती लोखंडी ग्रीलची संरक्षक जाळी बसविण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली. त्या निवेदनाच तात्काळ दखल घेऊन मनपा उपआयुक्त धनराज पांडे यांनी विणकर बागेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

या पाहणीत, वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपयुक्त पांडे यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करून विणकर बागेचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आनंद गोसकी यांना आश्वासन दिले. 

हल्ली विणकर पुतळ्याला जाळी नसल्याने लहान मुले थेट पुतळ्यावर जाऊन बसतात. त्या पुतळ्याभोवती असलेल्या हिरवळीवर काही जण झोपा काढतात. बागेच्या मागच्या गेटच्या बाजूला भिंत तुटली असल्याचा गैरफायदा घेऊन मद्यपी मंडळी, त्या आडमार्गाने बागेत येऊन मद्यपान करतात, गोंधळ घालतात आणि शिवीगाळी करतात, त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे.

याप्रसंगी वसंत कामुर्ती, पुरूषोत्तम वग्गा, श्रीशैल काटकर, शाम गुंडु अन्य नागरिकांनी  सांगण्यात बागेतील सोमपा कर्मचारी रात्रीच्या वेळी गेट उघडत नसल्याचे व कर्मचारी व्यस्थित देखभाल करीत नसल्याच्या तक्रारी उपाआयुक्त पांडे यांच्याकडे केल्या. त्याचीही तात्काळ दखल घेत,पांडे यांनी तात्काळ सोमपाचे जमादार व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना फैलावर घेत, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या.

उप-आयुक्त पांडे यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेउन स्वत: पाहणी करण्यास आल्याबद्दल व तात्काळ कामे मार्गी लागल्याबद्दल जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी पांडे यांचे आभार व्यक्त केले.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी | महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय | सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

Next Post

सोसायटी सचिवांनो, आपआपली नोकरी करायची बरं का..,नाय तर प्रॉपर्टी बाहेर काढेन….!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोसायटी सचिवांनो, आपआपली नोकरी करायची बरं का..,नाय तर प्रॉपर्टी बाहेर काढेन....!

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979109
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group