सोलापूर : संपूर्ण जगभरात कोरोना वायरसच्या नवा व्हेरियंट असलेल्या ओमीक्रोन वायरसच्या संसर्गाची धसका घेण्यात आला आहे. 85 टक्के देशात या वायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्येही ओमीक्रोनचा संसर्ग झाला असून जरी संख्या 73 असली तरी त्याची 45 टक्के संख्या ही एका महाराष्ट्रात आहे. असे असताना शासनाने काही निर्बंध सक्त केले आहेत. संपूर्ण अनलॉक झालेले महाराष्ट्र राज्य आता पुन्हा निर्बंधमध्ये अडकल्याचे पाहायला मिळते.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या लगतच असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ओमीक्रोन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा सोलापूर शहरांमध्ये कडक निर्बंध घातले आहेत. जमावबंदी लागू असून हे निर्बंध येत्या 29 डिसेंबर पर्यंत आहेत. कोणताही जमावाचा कार्यक्रम झाला तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल होत आहेत असे असताना सोलापूर शहरात क्रेडाई संघटनेच्या प्रोपर्टी एक्सपो 2021 या प्रदर्शनाला मात्र परवानगी देण्यात आली आहे.
ओमीक्रोनचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे जमावबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रदर्शनाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रदर्शन भरल्यानंतर निश्चितच हजारो लोकांची गर्दी ते पाहायला उसळेल यातून संभाव्य धोका टाळता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने दोन लसीकरण सक्तीचे केले आहेत. याची तपासणी या प्रदर्शनावेळी होणार का? या प्रदर्शनामध्ये सहभागी सर्वांचे लसीकरण झाले आहे का? याची सुद्धा तपासणी तितकीच महत्त्वाची आहे.
जव्हेरी ऍड एजन्सीची मात्र मर्जीतल्यांवरच ‘कृपादृष्टी’
सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे, त्यामध्ये यूट्यूब चैनल, न्यूज पोर्टल, न्यूज ब्लॉग या माध्यमातून प्रत्येक तासाचे अपडेट, बातम्या, ब्रेकिंग न्यूज हातात असलेल्या मोबाईलवरच आता पाहायला मिळत आहेत असे असताना सोलापूर शहरातील ‘जव्हेरी ऍड एजन्सी’ने जाणीवपूर्वक माध्यमातील अनेक पत्रकारांना जाहिराती दिल्या नाहीत त्यांनी केवळ आपल्या मर्जीतल्याच पत्रकारांवर कृपादृष्टी ठेवल्याचं पाहायला मिळतं.
जव्हेरी ऍड या एजन्सी बाबत कायमच सर्वसामान्य पत्रकारांमध्ये ओरड आहे. सहकार्याची भावना नसते, तोंड बघून जाहिराती देणे, मर्जीतला असल्याने ज्यांच्या बातम्या पहिल्या जात नाहीत, तरीही अशांना जाहिरात दिल्या जातात. जाहिरात देणार्यांची कोणतेही कारण नसते, मात्र स्वतःची मनमानी कारभार जव्हेरी ऍड करत असल्याची काही पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

















