सोलापूर : सिंधुजा डेव्हलपर्सचे प्रमुख, कर्नाटक राज्यातील मोठे व्यावसायिक अशोक गुत्तेदार हे गुरुवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते, जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांनी त्यांना आपल्या कार्यालयात निमंत्रित केले होते. यावेळी बाराचारे यांनी अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कांबळे यांना ही बोलावून घेतले. त्यांच्या हस्तेच सत्कार घडवून आणला.
अनिरुद्ध अण्णा आणि अण्णाराव यांनी एकत्रित अशोक गुत्तेदार यांचा यथोचित सन्मान केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत बाराचारे यांनी सत्कार घडवून आणल्याने गुत्तेदार भारावले. यावेळी अक्कलकोट पंचायत समिती सभापती सोनकांबळे, सदस्य नितीन नकाते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभारीचे जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे यांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून त्या भागात चांगलाच जम बसवला आहे. कुंभारीची ग्रामपंचायत प्रथमच पूर्ण ताकदीने भाजप समर्थकांच्या ताब्यात आली आहे. अशोक गुत्तेदार यांची कुंभारी परिसरात सुमारे 100 एकर जमीन असून त्यावर प्लॉटींग सुरू आहेत. अण्णाराव बाराचारे यांचं व्यवसायात सहकार्य गुत्तेदार यांना असल्याने बाराचारे यांना हवी ती मदत गुत्तेदार करत असल्याची माहिती आहे.
अशोक गुत्तेदार सारख्या बड्या हस्तीचा सत्कार झेडपीत घडवून अण्णाराव बाराचारे यांनी आपल्या अंतर्गत विरोधकांना जो संदेश द्यायचा तो दिलाय.

















