दक्षिण सोलापूर : नांदणी ते बरूर (#Nandani_Barur) हा रस्ता अत्यंत खराब झाला होता, या रस्त्यावर नांदणी ते बरूर पुढे हत्तरसंग कुडल हे पर्यटन क्षेत्र आहे. परंतु नांदणी ते बरूर हा रस्ता खराब असल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत होता, बाजारपेठ असल्याने शेतकरी वर्ग व स्थानिक नागरिकांना गैरसोय होत होती,
अनेक वर्षांपासून हा प्रश्न होता यामुळे नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे यांनी जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापूरे #Suresh_Hasapure यांना अडचण सांगितली असता त्यांनी लगेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्रव्यवहार करून सदर रस्ता करण्यासाठी निधीची मागणी केली तसेच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी याबाबत लक्ष घातले.
अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी मोलाचे सहकार्य केले, या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याबाबत प्रयत्न केल्यामुळे नांदणी ते बरूर या डांबरीकरण रस्त्यांसाठी 1 कोटी 70 लाख मंजूर झाले असल्याची माहिती नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे यांनी दिली. त्यांनी याप्रकरणी सुरेश हसापुरे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.


















