सोलापूर : श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूरच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2022 गायत्री भवन चाटी गल्ली येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाच्या वर्षी प्रथमच दिनदर्शिकेच्या 5 हजार प्रतीचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय अंजिखाने व यतीराज होनमाने यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर अतनुरे यांनी केले
कॅलेंडर प्रकाशन ह.भ.प लक्ष्मण महाराज चव्हाण,जिल्हा पंतलु,मिलिंद थोबडे,नगरसेवक जगदीश पाटील,सुरेश पाटील,आप्पासाहेब पाटील, सुधीर बहिरवाडे,संजय साळुंखे, बिज्जू प्रधाने,अमर बिराजदार,चन्नविर चिट्टे ,आकाश शिरते,कळमनकर काका आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी आपल्या मनोगतात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले की प्रभू श्रीरामाचे फक्त राम नवमीला मिरवणूक काढणे म्हणजे धार्मिक कार्य नव्हे तर वर्ष भर प्रभू श्रीरामांच्या नावाने समितीच्या माध्यमातून हिंदु धर्माच्या सुरक्षिततेसाठी व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याचे कार्य आपण जे करत आहात ते कौतुकास्पद असल्याची शाबासकीची थाप समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.
कार्यक्रमास नगरसेवक अमित पाटील, बिपीन पाटील, कल्याण चौधरी,अमर गट्टी,नरेश ताटी,बंटी बेळमकर,भीमाशंकर झुरळे,भिमाशंकर जमादार,शशी गडगे, नागेश कोळी,किरण वल्लाल,गुरू कोळी,शाम जानकर, शुभम लांडे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने,महेश जेऊर,धीरज छपेकर,संदीप महाले,सतीश परेली,प्रवीण गलांडे,विशाल बनसोडे,रोहित परीट,बसवराज चडचन,मयूर अंजिखाने, गणेश घुगरे,पिनू करपे,रोहित कोळकुर,आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश जेऊर यांनी केले.
















