Tuesday, October 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर | शहरातील गुन्हेगारांना दिला हा इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 January 2022
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-  सोलापूर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंतर्गत एमपीडीए कक्ष असून या कक्षामार्फत सोलापूर शहरांमधील सराईत गुंडांच्या टोळीत अवैध धंदे करणारे टोळी प्रमुख तसेच समाजकंटक प्रमुखांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, अवैध वाळू उपसा करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यात बाबतचा अधिनियम 1981 च्या या कायद्यान्वये येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात येते.

सन 2021 मध्ये एकूण 14 टोळी प्रमुखांवर माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये पद्धतीची कारवाई केली आहे. यापैकी 9 धोकादायक इसम व 5 हातभट्टीवाले ईसम यांच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 या कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे. या सराई टोळी प्रमुखांना येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवाना करून स्थानबद्धतेची कारवाई पूर्ण केली आहे त्यामुळे त्यांच्या सराईत गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध झालेला आहे. तसेच यामुळे सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत झालेली आहे.  पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशाप्रमाणे बापू बांगर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजय साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र गुरव पोलीस, उपनिरीक्षक विरेंद्र सिंग बायस व विशेषतः एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस नाईक विनायक संगमवार, पोलीस नाईक सुदीप शिंदे, पांडुरंग धानुरे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी यशस्वीपणे कारवाई पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सदर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी वेळोवेळी भरघोस बक्षिसे देऊन गौरविले आहे. 

नागपूर शहर व पुणे शहर यांच्यानंतर तुलनेने लहान असलेले पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांची कामगिरी महाराष्ट्रात तिसर्या क्रमांकावर आहे. सदरच्या कारवाईमुळे सोलापूर शहर पोलिस दलातील प्रतिमा उंचावली असून एम पी डी एस अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापूर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणतीही गुंडागर्दी खपवून न घेता पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून सन 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्यान्वये अशीच कारवाई चालू राहणार आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : पत्रकार संतोष आसबे यांना पितृशोक

Next Post

सोलापूर | संजयमामा शिंदे आले ‘झेडपी’त | मला ही लोक करमाळयाचा मानत नाहीत, माढ्याचाच समजतात | काय घडले झेडपीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | संजयमामा शिंदे आले 'झेडपी'त | मला ही लोक करमाळयाचा मानत नाहीत, माढ्याचाच समजतात | काय घडले झेडपीत

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002747
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group