Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग | राज्यात निर्बन्ध कडक | सोलापुरात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले हे आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

*नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे*


*तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा प्रमुखांनी 100% लसीकरणा बरोबरच ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्यात*


*जिल्ह्यातील साखर कारखान्याला लसीकरणाची एक टीम उपलब्ध करून द्यावी*


*कोरोनाचे नियमांचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करावी*


*जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे तंतोतंत पालन करावे*


*कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला तात्काळ अर्थसाह्य मिळण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे*


सोलापूर, दि.9(जिमाका):- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झालेला दिसून येत आहे. राज्य शासनाने राज्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच आपल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशाप्रकारे लसीचे दोन्ही घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी दिली.

राज्यात जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांची (दि.8)व्ही.सी. द्वारे आढावा बैठक घेतली, त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, (Dilip Swami) अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव,(Himmat Jadhav) निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, (Shama Pawar) जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसात कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी शासकीय कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सार्वजनिक अस्थापना बरोबरच पेट्रोल पंप, मंगल कार्यालये व  गर्दी होणाऱ्या सर्व खाजगी ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसी चे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा. सर्व संबंधित यंत्रणांनी याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले.

सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुख व तालुकास्तरावरील यंत्रणा प्रमुख यांनी अत्यंत कार्यक्षम पणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीची

आपापल्या कार्यक्षेत्रात अंमलबजवणी करावी तसेच लसीकरण कमी झालेल्या तालुकास्तरीय यंत्रणांनी त्यांच्या तालुक्यात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी प्राधान्याने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी देऊन पोलीस विभागाने ही रस्त्यावर उतरून कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी असेही त्यांनी निर्देशित केले.     

जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यातील ऊस तोड कामगार तसेच कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे 100% लसीकरण होण्यासाठी संबंधित कारखान्याने त्या-त्या तालुक्यातील तालुकास्तरीय यंत्रणेशी समन्वय ठेवून एक लसीकरण टीम उपलब्ध करून घ्यावी. यासाठी साखर सहसंचालक यांनी साखर कारखाने व प्रशासन यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी व लसीकरण करून घ्यावे अशी सूचना श्री. शंभरकर यांनी केली.

कोरोना बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील वार रूम तात्काळ सुरू कराव्यात. जिल्ह्यात सध्या 1800 पर्यंत कोरोना चाचण्या होत आहेत ही संख्या वाढून ती किमान दिवसाला पाच हजारापर्यंत झाली पाहिजे यासाठी आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी पुढील आठ ते दहा दिवस अत्यंत दक्ष राहून लसीकरण व कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्न करावेत असेही शंभरकर यांनी सूचित केले. कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून ही लाट थोपवण्यासाठी नागरिकांनीही स्वतःहून लसीकरण करून घ्यावे तसेच कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करून 100% लसीकरण केले जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी लसीचे दोन ही डोस घेतले आहेत त्याच नागरिकांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस विभागामार्फत कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्यावर कारवाई सुरूच असून ती अधिक कडक करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर ढेले व लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर पिंपळे यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : चालू केलेल्या ताडी (शिंदी) दुकानांना स्थगिती द्या | पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Next Post

Solapur | सिद्धेश्वर यात्रेत मंदिर चालू, नंदीध्वज मिरवणूक नाही? अक्षता सोहळ्याला 50 जणच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur | सिद्धेश्वर यात्रेत मंदिर चालू, नंदीध्वज मिरवणूक नाही? अक्षता सोहळ्याला 50 जणच

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979122
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group