सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत ते सोलापुरात पुण्याहून पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने येणार असून पुन्हा पुण्याला हेलिकॉप्टरने परत जाणार आहेत. सकाळी 11 वाजता विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून ते थेट श्री सिद्धेश्वर देवस्थानला यात्रेनिमित्त दर्शनासाठी जाणार आहेत त्या ठिकाणी दर्शन केल्यानंतर ते सिव्हील हॉस्पिटलकडे रवाना होतील त्या ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने पाहणी आणि आढावा घेणार आहेत या आढाव्यानंतर ते लगेच विमानतळाकडे प्रयाण करतील आणि तिथून पुन्हा हेलिकॉप्टरने पुण्याला रवाना होतील कसा आहे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा पहा..

















