सोलापूर : महानगरपालिका निवडणूकीची प्रभाग रचना आणि आरक्षण कधी जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्य सरकारने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या नुसार सोलापूर महापालिकेने आराखडा सादर केला मात्र शासनाचे अद्याप कोणत्याही सूचना आल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक कधी लागतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेत 102 नगरसेवक पद आहेत. मात्र यंदा किमान दहा जागा वाढल्या आहेत. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा नमुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये 33 प्रभाग दिसत आहेत. ही जुनी प्रभाग रचना आहे की नगरसेवकांच्या जागा वाढण्या पूर्वीची रचना आहे हे कोडे आहे.


















