Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बार्शीचा “बिग बुल”विशाल फटेचा हा अंडरवर्ल्ड डॉन होता आदर्श | शनिवारी दिवसभरात काय घडले | कोण आणि काय आहे फटे ‘स्टोरी’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




बार्शीतील ‘फटे स्कॅम’ प्रकरणात पहिली अटक झाली आहे.  मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.  मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे. अंबादास फटे, भाऊ वैभव फटे या दोघांना बार्शी न्यायालयानं पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हे ही वाचा : सोलापूर महापालिका निवडणुक प्रभाग रचनेचा नकाशा व्हायरस

गुन्हा दाखल होताना 6 तक्रारदारांचे जवळपास 5 कोटी 63 लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र परवा रात्रीपर्य़ंत तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास 12 कोटींवर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला तपास पोलिस निरीक्षकांकडे होता मात्र आता हा तपास डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करत आहे. या बाबतीत विशेष तपास पथक देखील नेमलं जाण्याची शक्यता आहे. 

मागील आठवड्याभर केवळ चर्चा सुरु असलेल्या बार्शीतल्या स्कॅमप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला होता. आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे यानेच शेवटी या प्रकरणात फिर्याद दिली . विशालने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांना देखील विशाल फटेने कोट्यवधींची फसवणूक केली आहे.

दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर मात्र एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सध्या ‘फटे’ची चर्चा आहे.  विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही अधिकारी व  प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. 

विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर साई नेट कॅफे नावाने तो नेट कॅफे चालवत होता. इथूनच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. 2019 साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख विशाल सोबत झाली. नंतर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली. 

विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह आपल्या परिवारातील सदस्यांचे, नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले.

जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. 

विशाल फटे विरुद्ध गुन्हा नोंद होताच पोलिसांनी उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्य़ालयाची आणि बार्शीतील घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी विविध कागदपत्रे, चेकबुक जप्त केल्याची माहिती आहे. सोबतच विशालचे कार्य़ालय आणि घर देखील पोलिसांनी आता सील आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी विविध बँकेतील त्याची खाती पत्र देऊन गोठवण्यात आली आहे.

गेल्या पाच दिवसापासून चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी विशाल अंबादास फटे याच्यावर गुन्हा (crime news) दाखल झालाय.

या विशालने जगातील सर्वात श्रीमंत माफिया ‘डॉन पाब्लो एस्कोबारला आदर्श मानलय. जिंदगी असावी तर पाब्लोसारखी असे तो नेहमी म्हणायचा. (Don Pablo Escobar) विसाव्या शतकातील जगातील सर्वात श्रीमंत आणि विलासी माफिया डॉन पाब्लो एस्कोबार हा बिगबुल (bigbull) विशाल फटेचा आदर्श होता. तो नेहमी पाब्लोचे व्हिडीओ  पहायचा आणि जिंदगी असावी तर पाब्लो सारखी, असे म्हणायचा. पाब्लोनेही त्याच्या आयुष्यात पैसे कमविताना कशाचाही विधिनिषेध बाळगला नाही. फक्त पैसे कमविणे हेच त्याचे ध्येय होते. त्याने अवैध व्यवसायातून आयुष्यभर इतके पैसे कमविले की 1989 मध्ये त्याला जगातील सातव्या क्रमाकांची श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याला आलिशान बंगले, गाड्या आणि उंची राहणीमानाचा शौक होता. पाब्लोच्या ऐषोआरामाचे अनेक किस्से प्रचलीत आहेत. एकदा प्रवासात असताना थंडीत उब मिळविण्यासाठी त्याने 2 मिलियन डॉलरची म्हणजेच भारतीय चलनात 15 कोटी रुपयांच्या नोटांची शेकोटी पेटवली होती. हाच पाब्लो विशालच्या डोक्यात सदैव थैमान घालत होता. हातात पैसा खेळू लागल्यानंतर त्याच्याही राहणीमानात बदल झाला होता. त्याच्या वागण्या बोलण्यातून नवश्रीमंती डोकावू लागली होती.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा नमुना फिरू लागला सोशल मीडियावर

Next Post

धक्कादायक | स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळली | सोलापूरचे तिघे ठार, एक गंभीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक | स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळली | सोलापूरचे तिघे ठार, एक गंभीर

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986284
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group