सोलापूर : स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 6 व्या पुण्यतिथीनिमित्त माजी स्वीकृत सदस्य प्रमोद मोकाशी मित्र परिवारातर्फे शंभुलिंग स्मृती निवास बाळी वेस मसरे गल्ली येथे रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 51 जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, उद्योजक सुधीर थोबडे व सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी आनंद मुस्तारे आदी उपस्थित होते. जगावर कोरोना ओमीक्रोनचा प्रभाव दिवसें दिवस वाढत आहे, अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. मोकाशी परिवाराच्या वतीने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे असे खरटमल म्हणाले
या शिबिरासाठी अनिल मसरे, निलेश मसरे, नारेश दासरी, राघवेंद्र सावळगी, अमर हळी, राहुल म्हेत्रे, लिंगराज म्हेत्रे, दीपक सातभाई, योगेश सातभाई, सोमनाथ माळशेट्टी, अमोल साखरे, सागर दीक्षित, विकास बलोदगी, ईरप्पा राजमाने, बसवराज दर्गोपाटील, गुरशांत मोकाशी यांनी परिश्रम घेतले


















