“सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकने प्रथमच दिनदर्शिकेवर क्युआर कोडचा वापर केला आहे. दिनदर्शिकेवर दिलेला क्युआर कोड स्कॅन केल्यास सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्य सेनानी यांची माहिती तात्काळ मिळेल. सामाजिक व सभासदांच्या हितासाठी उपक्रमात नेहमीच नाविन्य जपणारी पतसंस्था म्हणून पतसंस्था क्र 1 चा त्यामुळेच नावलौकिक आहे”.
सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व स्वातंत्र्यलढ्यात सोलापूर स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान असा राष्ट्रीय संदेशित दिनदर्शिका प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. 1930, 1942 च्या आंदोलनात सहभाग, सोलापूरच्या स्वातंत्र्यसैनिकांनी सर्वप्रथम स्वातंत्र्याची अनुभूती संपूर्ण सोलापूरकरांना भारत स्वतंत्र होण्यापूर्वी दिली हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे काम सोलापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी केले अशी भावना प्रमुख पाहुणे डॉ श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे केलेल्या शौर्यगाथेचे दिनदर्शिकेच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे काम या दिनदर्शिकेच्या माध्यमातून केले असल्याचे प्रतिपादन केले . क्यू आर कोडच्या माध्यमातून स्वतंत्र सैनिकाची माहिती सर्वप्रथम पोचवण्याचे काम पतसंस्था क्रमांक एक ने केली असल्याने ही बाब कौतुकास्पद असल्याचे भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्याच्या वारसदारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी व विजयराज डोंगरे सभापती अर्थ व बांधकाम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजशेखर शिवदारे यांनी ही आपले भाषण केले.
या कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. ऋतुराज बुवा, वसंतराव पोतदार, विनोद कामतकर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त पत्रकार संतोष आचलारे, संगमेश जेऊरे यांचाही सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते तिळगुळ व महिला कर्मचाऱ्यांना हळदी, कुंकू व वाण वाटप करण्यात आले. दिनदर्शिकेसाठी योगदान दिलेले प्रा.डॉ.चंद्रकांत चव्हाण, प्रा.डॉ.नभा काकडे, विनोद कामतकर, प्रसन्ना स्वामी यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक चेअरमन हरिबा सपताले तर आभार व्हाइस चेअरमन धन्यकुमार राठोड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ एस. पी माने यांनी केले .
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, मार्गदर्शक पंडित भोसले, दयानंद परिचारक, श्रीशैल देशमुख, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप, सुहास चेळेकर, हरिबा सपताळे, शहाजहान तांबोळी, सुंदर नागटिळक, विष्णू पाटील, शेखर जाधव ,सुखदेव भिंगे, श्रीमती मृणालिनी शिंदे ,श्रीमती सुनंदा यादगिरी, त्रिमूर्ती राऊत, तज्ञ संचालक डॉ.एस. पी. माने,होते सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे ,नितीन येमुल विनोद कदम आदीनी परिश्रम घेतले.


















