सोलापूर : सोलापूर शहरातील जिल्हा कारागृह (Solapur District Jail) मध्ये 13 कैदी कोरूना पॉझिटिव झाले आहेत या 13 जणांना उपचारासाठी महापालिकेच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे पॉझिटिव्ह असताना लक्षणे जास्त नसल्याने त्या कैद्यांना 7 दिवस आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या रुग्णांना सोडले जाते, पुढे सात दिवस ते कोरोन्टाईन राहण्याच्या सूचना आहेत.
दरम्यान त्या 13 कैद्यांची सात दिवसांची आयसोलेट उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे त्या कैद्यांना पुन्हा कारागृहात महापालिका पाठवणार आहे. मात्र जिल्हा कारागृहाचे अधीक्षकांनी त्या कैद्यांना एवढया लवकर जेलमध्ये घेण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या सर्वांच्या पुन्हा कोरोना चाचणी करूनच पाठवा अन्यथा आणखी काही दिवस आयसोलेशनमध्ये ठेवा अशा भूमिकेत जेलर आहेत.
एकतर या 13 कैद्यांमधील मोक्का गुन्ह्यातील कैदी संतोष कांबळे हा बेड्या काढून फरार झाला होता, मात्र त्याला पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या. यामुळे या कैद्यांना सांभाळणे हे पोलीस प्रशासन आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे.
दरम्यान याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता, कोरोना रुग्णांचा आयसोलेट पिरियड संपल्यानंतर परत कुणाचीही कोरोना टेस्ट केली जात नाही मात्र जिल्हा कारागृह अधीक्षकांनी पुन्हा टेस्ट करा अथवा काही दिवस आयसोलेशन मध्ये ठेवावे. ही विनाकारण डोकेदुखी असून पुन्हा त्या कैद्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.


















