सोलापूर : 25 जानेवारी हा संपूर्ण भारत देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष करून युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची संपूर्ण तयारी उपजिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यंदाच्या मतदार दिनाच्या दिवशी महानगरपालिका,
नगरपालिका, सर्व ग्रामपंचायतमध्ये लाऊडस्पीकर द्वारे मतदार जनजागृतीची शपथ देण्यात येणार आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तो कार्यक्रम जिल्ह्यातील 40 महाविद्यालयात लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली..


















