सोलापूर : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना मौन पाळले, त्यांचे मौन व्रत कशासाठी होते हेच कुणाला उमगले नाही.
त्याच झालं असं की, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठक घेतली, या बैठकीला भाजप आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. या बैठकीत अर्थमंत्री अजित पवारांनी जिल्ह्याला सुमारे 500 कोटींचा निधी दिला, त्याबद्दल महाविकास आघाडीच्या आमदारांनी आभार व्यक्त केले यावर आमदार बापू यांना उपस्थित पत्रकारांनी भाजपची प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तोंडातून एक शब्द सुद्धा काढला नाही, होय नाय ना काय नाय, यावरून त्यांचे मौन व्रत होते का? की त्यांना पत्रकारांची ऍलर्जी हे समजले नाही. दरम्यान त्यांचे हावभाव कसे होते पहा


















