सोलापूर : सहकार क्षेत्रातील मोठी संस्था समजली जात असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 131 अर्ज दाखल झाले. या अर्जाची छाननी सोमवार 31 जानेवारी रोजी होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी अर्ज छाननीचे स्थळ बदलले असून उपनिबंधक कार्यालय ऐवजी जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात ही छाननी होणार आहे.
माजी चेअरमन दिलीप माने या प्रमुख नेत्याचा अर्ज शुक्रवारी दाखल झाला. आमदार संजयमामा शिंदे, माजी उपाध्यक्ष मनोहर डोंगरे, माजी चेअरमन प्रशांत परिचारक यांनी मात्र यंदा निवडणुकीकडे पाठ फिरवली. निवडून द्यायच्या 17 संचालक पैकी 12 जागा सर्वसाधारण, 2 महिला, 1 अनुसूचित जाती, 1 इतर मागासवर्ग, 1 भटक्या विमुक्त जाती समावेश असून क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी या मतदारसंघाच्या 12 जागांसाठी 68 अर्ज, महिला प्रतिनिधी मतदार संघाच्या दोन जागेसाठी 34 अर्ज, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 5 अर्ज, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एक जागेसाठी 13 तर त्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 17 अर्ज दाखल झाले आहेत.
पहा कोणी- कोणी दाखल केले उमेदवारी अर्ज ही यादी


















