सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने महिला बचत गटांना शहरी भागातील शाळांना कोरडा आहार पुरवठा करण्यासाठी निर्णय घेतला होता,त्या अनुषंगाने दि. २७ जानेवारी रोजी १०० केंद्रीय स्वयंपाकगृहांसाठी बचतगट संस्थांसोबत करार केला आहे. आनंदाचे वातावरण राज्यातील जवळपास ५०० महिला संस्थाना या निर्णयाने आर्थिक फायदा होणार असल्याने सर्व महिला बचतगटांच्या वतीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन केले. सर्व महिला बचतगटांमध्ये आनंदाची भावना असल्याचे कृष्णाई महिला बचत गट बाळे अध्यक्षा सरस्वती ढेपे यांनी व्यक्त केली. कोरोना बंद असल्याने महिलांचा आहार शिजवून देण्याचे काम बंद झाले होते. परंतु किचनचे भाडे, साहित्याची व गुंतवणूक कामगारांचे पगार यामुळे राज्यातील केंद्रीय स्वयंपाकगृह बचत गट आर्थिक अडचणीत आला होता. परंतु वर्षा गायकवाड यांनी महिला बचतगटांचे आर्थिक नुकसान भरून निघावे, यासाठी थेट महिला बचत गटामार्फत कोरडा शिधा शाळांना वाटप करण्याचा स्तुत्य निर्णय शिक्षण विभागाने घेतला.


















