सोलापूर : संदीप महाले मित्र परिवाराच्या वतीने महेश अण्णा कोठे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत नागरिकांनी केली संदीप महाले यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.
भाजपाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या घोंगडे वस्ती भागात सुरुंग लावण्यासाठी महेश अण्णा कोठे यांनी कंबर कसली असून,आज युवा नेते संदीप महाले यांनी आयोजित केलेल्या बैठकीला महेश अण्णा कोठे यांनी उपस्थित राहून,तेथील नागरिकांशी सवांद साधला व आपल्या भागातील कोणतेही अडचणी असल्यास मला कळवा आपण राज्य शासनाच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
बैठकीत जमलेल्या ज्येष्ठ नागरिक,महिला व तरुणांनी आमच्या भागातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सर्वसमावेशक तरुण नेतृत्व म्हणून संदीप महाले यांना आपण महापालिका निवडणुकीत संधी द्यावी अशी एकमुखी मागणी केली.
महेश अण्णा कोठे यांनी बैठकीत संदीप महाले यांचे कौतुक करताना म्हणाले की,संदीप सारख्या तरुण उर्जावान कार्यकर्त्यांची आम्हाला घोंगडे वस्ती भागातून गरज असून,आपण सर्वांनी जर संदीप च्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असाल तर मी नक्की संदीप ला संधी देईल असे आश्वासन महेश अण्णा कोठे यांनी दिले.
बैठकीत आभार मानताना संदीप महाले म्हणाले की,माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाच्या पाठीशी आपण जर उभे राहिलात तर,मी यंदाची निवडणूक लढविण्यास तयार असून,सामान्य कुटुंबातून आल्याने सामान्य नागरिकांच्या अडचणी मला ज्ञात आहे व त्या येणाऱ्या काळात सोडविण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असे सांगितले.















