Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | मुस्लीम समाजाला जमले नाही ते ख्रिश्चन-चर्मकार समाजाच्या श्रीदेवी जॉन फुलारे यांनी करून दाखवले | Special Report

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 February 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 “लाखो रुपयांचा निधी खर्च करून मोदी मुस्लिम कब्रिस्थानाचा नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलेला विकास मुस्लिम समाज कधीच विसरणार नाही कायमच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे गौरवोद्गार शहर काझी सय्यद अमजद अली यांनी काढले”.

सोलापूर : सोलापूर नगरी ही सर्वधर्मसमभाव समभावाची म्हणून ओळखली जाते. मराठी,कन्नड आणि तेलगू भाषेचा संगम असलेले सोलापूर. अनेक सण, उत्सव,जयंती तितक्याच जल्लोषात साजरे होणारे सोलापूर. याच सोलापुरात फुलारे हे सर्वधर्मसमभाव जपणारे कुटुंब. घरात ख्रिश्चन व चर्मकार समाजाचा संगम. परंतू, मुस्लिम समाजाचा अतिशय महत्वाचा प्रश्न फुलारे दाम्पत्याने सोडवला. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कायम आपल्या भाषणात  सर्वधर्मसमभावाचे उदाहरण देतात, त्यांच्या या शब्दाला त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरवले.

सोलापूर शहरात मुस्लिम समाजाला काँग्रेस पक्षाकडून महापौर पद,स्थायी समिती सभापती पद, सभागृह नेते पद मिळालं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमहापौर पद,स्थायी समिती सभापती पद सुद्धा मिळालं आहे. या भागात मुस्लिम समाजाच्या मतांवर अनेक जण आमदार खासदार झाले, अनेक जण मोठे नेते झाले परंतु या एकालाही जे जमलं नाही ते एका चर्मकार समाजाच्या नगरसेविकेने सोलापुरात करून दाखवले. 

शहराच्या मध्यवर्ती भागात मुस्लिम समाजाचे मोदी कब्रस्थान आहे. शहरात सर्वात जुने आणि मोठे कब्रस्थान असल्याने त्याची दुरवस्था झाली होती. या भागात नगरसेविका श्रीदेवी फुलारे या 10 वर्षांपासून काम करतात.

ही दुरवस्था त्यांना पहावली नाही. मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांचा मुस्लिम स्मशानभूमी सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू होता. आपल्या भांडवली निधीतून तब्बल 86 लाखाचा निधी त्यांनी या सुशोभीकरण कामासाठी दिला. 

आज स्मशानभूमीचे चित्र पाहिले तर कुणालाही विश्वास बसणार नाही इतके सुंदर आणि देखणे काम याठिकाणी करण्यात आले आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे. स्वतः सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांनी समोर थांबून काम करून घेतलंय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

नेमके याठिकाणी काय काम झाले..

भव्य प्रवेशद्वार..,  पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट…,  परिसरात पेव्हर ब्लॉक…,अंतर्गत रस्त्यांची सुधारणा…,   एल ई डी लाईटच्या माध्यमातून सर्वत्र प्रकाश…., अंत्यविधी साठी येणाऱ्या लोकांना हात पाय धुण्यासाठी पाण्याची  सुविधा…….,  नमाज पठणाच्या ठिकाणी रंगरंगोटी……… असे आमूलाग्र बदल झाले आहेत.

जॉन फुलारे यांनी लहानपणीची आठवण सांगताना, मी आईसोबत ख्रिश्चन स्मशानभूमीत राहायला होतो. खिश्चन स्मशानभूमी आणि मुस्लीम कब्रस्तानात खड्ढे खोदण्याचे काम करायचो. हे काम करताना एक रुपया दोन रुपया मिळायचे. कब्रस्तानच्या बाहेर अन्नदान व्हायचे. हे अन्न खाऊन दिवस काढले. लोकांचे दुःख मी जवळून पाहिले, येथील समस्याही माहिती होत्या. आता मी आणि पत्नीने मिळून कब्रस्तानचे सुशोभीकरण केल्याचे समाधान आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | व्वा,पोलीस आयुक्त साहेब मानले राव तुम्हाला, ही अपेक्षा सोलापूरकरांना किती वर्षांपासून होती

Next Post

Breaking | दिलीप माने, काका साठे, सिद्धेश्वर आवताडे, दिपक माळी यांचे अर्ज बाद | सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking | दिलीप माने, काका साठे, सिद्धेश्वर आवताडे, दिपक माळी यांचे अर्ज बाद | सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971657
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group