Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सर,मला माफ करा.., रणजित गुरुजी ‘डिसले’ स्वतःच्याच जाळ्यात ‘फसले’ | Ranjit Disle Guruji fell into his own trap

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले गुरुजी गेल्या आठवड्यात रजेच्या परवानगीवरून चर्चेत आले होते. पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी प्रलंबित ठेवली म्हणून डिसले यांनी प्रशासनावर मानसिक त्रास व पैसे मागणीचा आरोप केला होता. यावर आरोपाच्या खुलासा करण्यासाठी जिल्हा परिषदेने नोटीस बजाविल्यावर डिसले गुरूजींचे विमान जमिनीवर आले आहे. त्यांनी या आरोपाबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे आता स्पष्ट होतयं.

अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी हवी होती. दीड महिना शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवला, मानिसक त्रास दिला व पैशाची मागणी केली असा त्यांनी केलेला आरोप व मागील तक्रारीवरून चौकशी समितीने सादर केलेला अहवाल या दोन्ही कारणांनी राज्यभर वादळ उठले होते. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेत करीत जिल्हा परिषद प्रशासनाला तत्काळ परवानगी द्यायला लावली. 

दरम्यान मानसिक छळ कोणी केला व पैसे कोणी मागितले, अशी सीईओ दिलीप स्वामी यांनी त्यांना नोटीस बजावली. यामुळे डिसले गुरुजींच्या अडचणींत वाढ झाली व त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्था व विज्ञान केंद्रात हजर राहून प्रशिक्षण दिले का, हा वादाचा मुद्दा पुढे आला. डिसले गुरुजींनी आरोपांबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. ‘आता यापुढे मी प्रसारमाध्यमांपुढे जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर करीत प्रकरण थांबविण्याची त्यांनी विनंती केली आहे. त्यांच्या माफीनाम्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे.

पण या वादा च्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना डिसले गुरुजींचे उत्तर काय असणार आहे, याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या नोटीशीनंतर डिसले यांनी दोन पानाचे उत्तर दिल्याचे सांगण्यात आले. यात त्यांनी केलेल्या आरोपाबाबत माफी मागितली आहे. यापुढे मी प्रसारमाध्यमापुढे जाणार नाही असेही त्यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले. नोटीशीमुळे डिसले यांची मोठी अडचण झाली होती. 

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | महापालिका निवडणूक | प्रभाग 10 व 11 च्या प्रारूप रचनेवर हरकत | Municipal Election | Objections to the draft structure of Wards 10 and 11

Next Post

Breaking | नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी | Nitesh Rane remanded in police custody for two days

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking | नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी | Nitesh Rane remanded in police custody for two days

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979135
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group