सोलापूर : जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा ही ऑफलाईन घेण्याचा मागणीसाठी सभापती अनिल मोटे, भारत शिंदे, त्रिभुवन धाइंजे, मल्लिकार्जुन पाटील, नितीन नकाते, आनंद तानवडे, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, मंगला वाघमोडे, हे आक्रमक झाले होते. दुपारी दोन वाजता सभा होती. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या व्हीसी रूम मध्ये अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सीईओ स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांना बसण्याची सोय केली होती. आक्रमक सदस्य सीईओ यांच्या चेंबरमध्ये आले, स्वामी यांच्या समोर गोंधळ घातला, सभा ही ऑफलाईन घ्या, अन्यथा आढावा पाहिले घ्या,मात्र सीईओ स्वामी यांनी जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाइन सभेच्या सूचना आहेत.सभेचे अध्यक्ष कांबळे असून त्यांना विचारा असे म्हणून प्रशासनाची भूमिका मांडली. गोंधळ वाढला इतक्यात अध्यक्ष कांबळे सीईओ यांच्या चेंबर मध्ये आले.त्यांना सर्व सदस्यांनी घेरले. सभा रद्द करा, पहिले आढावा घ्या मग सभा असे म्हणून बराच वेळ गोंधळ झाला. शेवटी मीच निघून जातो म्हणून ते बाहेर गेले मात्र मागच्या दरवाजाने ते जीबीला जॉईन झाले. पण हे सर्व सदस्यांना पटले नाही. तिथे सभेला अरुण तोडकर हे सदस्य जॉईन झाले होते, तेव्हा भारत आबा यांनी ए अरुण तू गप्प बस तुझा गट स्थगित झालाय, म्हणून संताप व्यक्त केला.
अखेर सभापती मोटे, त्रिभुवन धाइंजे बाहेर पडले त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला..
दरम्यान उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पक्षनेते अण्णाराव बाराचारे, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल जाधव हे आरोग्य विभागात
होते.ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेलकांदे यांच्या कार्यालयात ऍड सचिन देशमुख, मल्लिकार्जुन पाटील बसले काही सदस्य ऑनलाइन जॉईन झाले.
















