सोलापूर : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 करोड सूर्यनमस्कार घालण्याचा राष्ट्रीय संकल्प करण्यात आला आहे.त्यात सोलापूर जिल्ह्याचे 11 कोटी सूर्यनमस्काराचे योगदान अंतर्गत मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. यावेळी एक हजार विद्यार्थ्यांनी 13 वेळा सूर्यनमस्कार घातला म्हणजे 39 हजार सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी घातले.
या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेराष्ट्रीय प्रकल्प समन्वयक संगीता जाधव, मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे, सिद्धप्पा वरनाळ गुरुजी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार, केंद्र प्रमुख सिद्राम वाघमोडे, धरेप्पा हत्तुरे, मुख्याध्यापक सचिन जाधव, पत्रकार रेवनसिद्ध जवळेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी प्रशालेच्या एक हजार विद्यार्थ्यांनी तीन टप्प्यात 13 वेळा सूर्यनमस्कार घालत 39 हजार सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला.
यावेळी सीईओ दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, कोरोनावर मात करायची असेल तर सूर्यनमस्कार हाच उत्तम पर्याय आहे. सूर्यनमस्काराचा रेकॉर्ड करणे हा उद्देश नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला सूर्यनमस्काराची सवय लावणे हा यामागील उद्देश असून ही निरंतर प्रक्रिया झाली पाहिजे जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा सूर्यनमस्कार घातलाच पाहिजे असे स्वामी म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख गंगाधर घोडके, क्रीडा शिक्षक चांदोडे सर, यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता कुलकर्णी यांनी तर आभार दत्तात्रय आगरखेड यांनी मानले.















