Monday, October 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मी पुन्हा आलेच…,मॅडम,तुमच्या विना ऑफिस पोरकं झालं होतं ओ | गुलाब पाकळ्यांच्या पायघड्यानं ‘बीडीओ’चे स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter




  



सोलापूर : उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जस्मिन शेख यांनी बुधवारी पुन्हा पदभार घेतला. मॅडम पुन्हा आल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या अंथरूण शेख मॅडम यांचे स्वागत केले.  माजी आमदार दिलीप माने आणि सभापती रजनी भडकुंबे यांच्या तक्रारीनंतर जस्मिन शेख यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली होती परंतु त्या उत्तर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर पुन्हा आल्याने दिलीप माने यांचे विरोधक श्रीमंत बंडगर व काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचा हात धरलेले हरिदास शिंदे या दोन नेत्यांनी विशेष बीडीओ मॅडमचे स्वागत व सत्कार केला.

जस्मिन शेख सप्टेंबर 2020 मध्ये उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी रुजू झाल्या होत्या, उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यासोबत कायमच त्यांचे वाद होत राहिले त्यांची सुमारे दहा ते अकरा महिन्यांची कारकीर्दही अतिशय वादग्रस्त राहिली आहे. सभापती सोबत प्रोटोकॉल न  पाळणे, कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलणे, कामचुकारपणा करणे, घरी बसून काम करणे, कोविड काळात हलगर्जीपणा करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या.

 मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना बऱ्याच वेळा समज दिली होती मात्र त्यांच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही या प्रकरणात सभापती रजनी भडकुंबे या थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री पर्यंत जस्मिन शेख यांची तक्रार केली होती. माजी आमदार दिलीप माने यांनीही या प्रकरणात लक्ष देऊन त्यांचा चार्ज काढून घेण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्याकडे केली होती. या सर्व तक्रारी नंतर 9 ऑगस्ट 2021 रोजी जस्मिन शेख यांची वाशिम जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बदली करण्यात आली होती मात्र या बदलीविरोधात या मॅटमध्ये गेल्या, वाशिम जिल्ह्यातील बदली कॅन्सल केली. पुन्हा सोलापूर जिल्ह्यात देण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचा पदभार घेण्याचा प्रयत्न केला होता सहा महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी पूर्णवेळ उत्तर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर आपली नियुक्ती आदेश ग्रामविकास खात्याकडून आणला. 

शेख मॅडमचा दरारा एवढा आहे की,  पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या हातरत एका ओळीत बुके घेऊन त्यांचे स्वागत केले. मॅडम हे स्वागत पाहून भारावून गेल्या होत्या. अनेक दिवस पंचायत समितीकडे न फिरणारे काही राजकीय नेते मॅडमचा स्वागताला आले. दुपारच्या सुमारास बीडीओ शेख यांनी सभापती रजनी भडकुंबे यांची भेट घेत यांचे त्यांचा सत्कार स्वीकारला आपण दोघी मिळूनी, काम करू हातात हात घालूनी” असा काही संदेश या दोन्हीनी दिल्याचं पाहायला मिळालं.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : 39 हजार सूर्यनमस्कार घालत मल्लिकार्जुन हायस्कूल व हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाने नोंदवला ‘विक्रम’

Next Post

पंढरपुरात सापडले दोन “पुष्पा” ; पंढरपूर पोलीस व वनविभागाच्या रेड मध्ये सापडले इतक्या लाखाचे चंदन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पंढरपुरात सापडले दोन "पुष्पा" ; पंढरपूर पोलीस व वनविभागाच्या रेड मध्ये सापडले इतक्या लाखाचे चंदन

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003024
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group