सोलापूर : उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जस्मिन शेख यांनी बुधवारी पुन्हा पदभार घेतला. मॅडम पुन्हा आल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या अंथरूण शेख मॅडम यांचे स्वागत केले. माजी आमदार दिलीप माने आणि सभापती रजनी भडकुंबे यांच्या तक्रारीनंतर जस्मिन शेख यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली होती परंतु त्या उत्तर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर पुन्हा आल्याने दिलीप माने यांचे विरोधक श्रीमंत बंडगर व काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचा हात धरलेले हरिदास शिंदे या दोन नेत्यांनी विशेष बीडीओ मॅडमचे स्वागत व सत्कार केला.
जस्मिन शेख सप्टेंबर 2020 मध्ये उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी रुजू झाल्या होत्या, उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यासोबत कायमच त्यांचे वाद होत राहिले त्यांची सुमारे दहा ते अकरा महिन्यांची कारकीर्दही अतिशय वादग्रस्त राहिली आहे. सभापती सोबत प्रोटोकॉल न पाळणे, कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलणे, कामचुकारपणा करणे, घरी बसून काम करणे, कोविड काळात हलगर्जीपणा करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना बऱ्याच वेळा समज दिली होती मात्र त्यांच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही या प्रकरणात सभापती रजनी भडकुंबे या थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री पर्यंत जस्मिन शेख यांची तक्रार केली होती. माजी आमदार दिलीप माने यांनीही या प्रकरणात लक्ष देऊन त्यांचा चार्ज काढून घेण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्याकडे केली होती. या सर्व तक्रारी नंतर 9 ऑगस्ट 2021 रोजी जस्मिन शेख यांची वाशिम जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बदली करण्यात आली होती मात्र या बदलीविरोधात या मॅटमध्ये गेल्या, वाशिम जिल्ह्यातील बदली कॅन्सल केली. पुन्हा सोलापूर जिल्ह्यात देण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचा पदभार घेण्याचा प्रयत्न केला होता सहा महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी पूर्णवेळ उत्तर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर आपली नियुक्ती आदेश ग्रामविकास खात्याकडून आणला.
शेख मॅडमचा दरारा एवढा आहे की, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या हातरत एका ओळीत बुके घेऊन त्यांचे स्वागत केले. मॅडम हे स्वागत पाहून भारावून गेल्या होत्या. अनेक दिवस पंचायत समितीकडे न फिरणारे काही राजकीय नेते मॅडमचा स्वागताला आले. दुपारच्या सुमारास बीडीओ शेख यांनी सभापती रजनी भडकुंबे यांची भेट घेत यांचे त्यांचा सत्कार स्वीकारला आपण दोघी मिळूनी, काम करू हातात हात घालूनी” असा काही संदेश या दोन्हीनी दिल्याचं पाहायला मिळालं.















