सोलापूर : कोरोना काळात दोन वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा स्वच्छ व सुंदर करण्याचा जिल्हा परिषदेने उपक्रम हाती घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या या अभियानामध्ये लोकवर्गणीतून सुमारे सहा कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आणि जिल्ह्यातील सुमारे 2700 शाळा या स्वच्छ व सुंदर शाळा झाल्या. चांगले काम केलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या पाठीवर थाप मारण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम देऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कौतुक घडवून आणले.
दरम्यान सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत आक्रमक सदस्य सुभाष माने यांनी स्वच्छ व सुंदर शाळा झाल्या, मात्र जी स्पर्धा घेतली ती बोगस होती, कुणालाही विचारात घेतले नाही, शाळा कशा निवडल्या असा प्रश्न उपस्थित करत आपण याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचा संताप व्यक्त केला….सुभाष माने काय म्हणाले सभागृहात…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे दीड तास या कार्यक्रमाला दिले, सीईओ स्वामी यांचे कामाचे कौतुक करत हा उपक्रम राज्यभरात राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे सभागृहात उपस्थित झालेल्या प्रश्नावर स्वामींचा चेहरा पडला मात्र त्यांनी असे उत्तर दिले की, सभागृहातील सर्वांची तोंडे बंद झाली…..पहा हा व्हिडीओ…
















