सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव गौतम खरात यांचे वयाच्या 38 व्या वर्षी अपघातात निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील हा कार्यकर्ता गेल्याने काँग्रेस पक्षासह सोलापूरवर शोककळा पसरली आहे.
आपल्या स्विफ्ट कार मध्ये मुंबईला जाताना त्याच्या गाडीला मंगळवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला, त्याच्यासोबत त्याचे तीन मित्रही जागीच मरण पावले. मयतापैकी तिघे एकाच परिसरातले असल्याने या भागात अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. प्रत्येकाच्या तोंडात गौरव खरात यांच्या अपघाती निधनाची चर्चा होती, गौरव खरात यांचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा आणण्यात येणार आहे.
खोपोली येथे त्यांचे मित्र नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, त्याचे बंधू एडवोकेट मयूर हे गेले आहेत या ठिकाणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या सर्वांची भेट घेऊन खरात कुटुंबियांचं सांत्वन केल्याची माहिती मिळाली. गौरव सह इतर चौघांवर बुधवारी सकाळी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
गौरव खरात हे बुद्ध नगर फॉरेस्ट या ठिकाणी राहत होते, त्यांचे वडील एडवोकेट गौतम खरात व भाऊ मयूर खरात हे वकिल आहेत, पत्नी, दोन मुली, आई-वडील, तीन भाऊ असा खरात यांचा परिवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक विनोद भोसले यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून गौरव खरात यांच्याकडे पाहिले जात होते. भाजप नेते तथा माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासोबत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध गौरव खरात यांचे होते.
गौरव खरात यांचा राजकीय प्रवास
जन्म : 20 ऑगस्ट 1984
शिक्षण : बीएसी ऍग्री,
2005 साली जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात,
मोहोळ तालुका युवक सरचिटणीस पदी निवड, 2007 मध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली,
2011 साली येनकी ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजय मिळवला,
2012 ते 2015 साली मोहोळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष.
2014 मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली, 2018 साली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पद,
















