Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

झेडपी सभागृहात ‘उत्तर’ देऊन ‘दमले’ अन् वडाळ्यात दुसऱ्या दिवशी ‘रमले’ | सीईओ स्वामींनी इथेही जपली मैत्री

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारचा आपला दिवस वडाळा गावाला दिला. वडाळा गावाला जाण्याच्या एक दिवसांपूर्वी झेडपी आढावा बैठक झाली. 

ऑनलाइन सभा नको, नको म्हणून ओरडणाऱ्या सदस्यांची मर्जी राखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अखेर ऑफलाईन पद्धतीने घेण्यास होकार दिला. त्यामुळे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच आढावा बैठक होती. काही सदस्यांचा त्या दिवशी मूड रोमँटिक होता. सभा अशाच  मूडमध्ये होईल असे चित्र होते. परन्तु त्यावर सुभाष माने यांनी पाणी फेरले.

स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमातील पुरस्कार निवडीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते या विषयावर तुटून पडले, इतर अनेक सदस्यांनी संधी साधली आणि माने यांच्या बाजूने आणि प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून एवढे कौतूक झाले असतानाही सदस्यांच्या अशा भूमिकेवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तीव्र नाराज झाले, बराच वेळ ऐकून घेतल्यावर त्यांनी ही चवताळून उत्तर दिले, कुणालाही बोलू दिले नाही, समोरच्यांची तोंडे बंद केली.

परत सभागृहात उत्तर पंचायत समिती बीडीओ पायघड्या स्वागत प्रकरण, डिजिटल शाळा प्रकरण, आरोग्य विभाग टार्गेट, 15 वित्त आयोग निधी खर्च प्रकरण समोर आले. या सर्वात प्रशासन टार्गेट होते, दिवसभर सभागृहात दिलीप स्वामी उत्तर देऊन दमल्याच चित्र होतं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे व मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार हे तिघे एकाच गाडीत व्हिजिटला नेमके कुठे गेले हेच कुणाला समजले नाही. नंतर वडाळा गावातील व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वाना समजले. स्वामी यांनी दिवसभर वडाळ्यात घालवत, सुरुवातीला ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड रूमची पाहणी केल्यानंतर स्मशानभूमी येथील शरद वन पाहणी केली,मारुती मंदिर व गणेश मंदिर पाहणी केली . तसेच वडाळ्यातील शाळा व कॉलेजची सुद्धा पाहणी करत 10 मिनिटे  शिक्षक व प्राचार्यां बरोबर गप्पा मारल्या. 

यावेळी स्वामींनी आपले मित्र प्रेम जपले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा परिषदेतील ऑनलाइन कार्यक्रमाला अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते काका साठे यांना प्रशासनाने एका तालुकाध्यक्षा मार्फत निमंत्रण दिले गेले,  त्या तालुकाध्यक्षाने आपल्या नेत्याला सांगितले नाही. अजित पवारांच्या कार्यक्रमात काकांना प्रशासनाकडून व्यवस्थित वागणूक मिळाली नाही, त्याच्या बातम्या छापून आल्या.  सीईओ स्वामींच्या एवढा जवळ हे तालुकाध्यक्ष कसे गेले असे प्रश्न उपस्थित झाले, जिल्हाध्यक्ष पेक्षा तालुकाध्यक्ष मोठा कसा?असा प्रश्न दैनिकांनी उपस्थित केला. याची चर्चा संपूर्ण झेडपीत, वडाळ्यात, उत्तर तालुक्यात नाही तर जिल्ह्यात झाली होती. वडाळा दौऱ्यात स्वतः साहेबांनी त्या तालुकाध्यक्ष मित्राला वडाळ्याला बोलवले होते अशी माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली.

आपल्या मित्राचा कार्यक्रम होऊ नये म्हणून सीईओ स्वामींनी करेक्ट टायमिंग साधला. काकांच्या कामांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. काकांना खुश करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, विद्यमान विरोधी पक्षनेते काका साठे यांनी ऑनलाइन सभेला विरोध केला होता. परंतु सोमवारी सभागृहात ऑफलाईन पद्धतीने आढावा बैठक झाली. त्याला मात्र काका साठे यांनी दांडी मारली होती. 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : कोण आहे गौरव खरात? ; काय होता राजकीय प्रवास वाचा सविस्तर

Next Post

Solapur : काका साठे म्हणाले, ‘बचाव बचाव’…,जिल्हा दूध संघ ‘बचाव’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : काका साठे म्हणाले, 'बचाव बचाव'...,जिल्हा दूध संघ 'बचाव'

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972335
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group