सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन मध्ये “लडकी हूं, लढ सकती हु” या अभियानातर्गत प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे दिवसभर चालणार्या या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सोनल पटेल, आमदार प्रणिती शिंदे, प्रशिक्षक यशराज पारखी, शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, नगरसेविका फिरदोस पटेल, नगरसेविका अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, नगरसेविका वैष्णवी करगुळे, अलका राठोड, संध्या काळे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, मनीष गडदे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने “लडकी हूं, लढ सकती हु” हे अभियान देशभरात राबविले जात आहे. राष्ट्रीय सरचिटणीस सोनल पटेल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राबविले जात आहे.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने लढवायच्या आहेत, त्यासाठी महिला कार्यकर्त्या सक्षम करण्यासाठी पक्षाने प्रियांका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची सुरुवात केली आहे.
नुकतेच मी उत्तर प्रदेशात प्रचारासाठी जाऊन आले, आपला महाराष्ट्र खूप पुढे गेलाय, अजूनही तिथे महिलांना भीती वाटते.तिथल्या समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने महिलांसाठी तसे वातावरण निर्माण केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. अशा यूपी मध्ये प्रियंका गांधी एकट्या लढत आहेत. तब्बल 40 टक्के महिलांना त्यांनी तिथे उमेदवारी दिल्याने महिलांमध्ये काँग्रेस बाबत आदर भावना निर्माण झाल्याचे शिंदे म्हणाल्या….

















