सोलापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांचा सोलापुरात शुक्रवारी दौरा असल्याने सोलापुरातील शिवप्रेमींनी राज्यपाल कोशारी यांना सोलापुरात येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. आसरा चौकामध्ये सुमारे 20 हजार शिवप्रेमी आंदोलन करतील असे सांगण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आसरा चौकात शिवप्रेमींनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. चले जाव चले जाव, कोशारी चले जाव अशी घोषणाबाजी केली…
आसरा चौकाला छावणीचे स्वरूप आले होते पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे सर्व रस्ते आडविण्यात येणार आहेत. प्रत्येकाला तपासून पोलीस पाठवत आहेत. पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व उपायुक्त बापूसाहेब बांगर हे आसरा चौकामध्ये तळ ठोकून आहेत.

















