सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात असलेल्या सिद्धनाथ साखर कारखान्यात गुरुवारी आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. माजी आमदार दिलीप माने यांचा हा सिद्धनाथ साखर कारखाना आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता कारखान्यातील जुन्या टायरला आग लागली आणि त्याच्या शेजारी असलेल्या बगॅसने पेट घेतला. त्यामुळे आगीच्या धुराचे लोट आकाशात दिसून आले या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या सिद्धनाथ साखर कारखान्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही घटना दुपारी एक ते दीड च्या दरम्यान घडली. आगे मध्ये बगॅसचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

















