सोलापूर : कुणाचा मृत्यू कुठे येईल, काळ कसा येईल आणि कुणाला कसा घेऊन जाईल हे कधीच समजत नाही. एकीकडे धुलीवंदन सणाचा सर्वत्र उत्साह सुरू असताना पंढरपूर तालुक्यातील चळे गावात मात्र दोन युवकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सणाच्या दिवशी नदीत मासे पकडणे दोन युवकांच्या जीवावर बेतले. मासे पकडत युवक नदीजवळ बसले तेव्हा एका शेतकऱ्यांने नदीतील मोटार काढण्यास बोलाविले. आणि घात झाला, विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला.
मासे पकडण्याचे सोडून आनंदा शिवाजी मोरे (वय ४२) आणि राजू गोविंदा सातपुते (वय ३०)(दोघे रा.चळे ता.पंढरपूर) हे दोघे शेतकऱ्याच्या मदतीसाठी गेले. मोटार काढत असताना मोटारीमध्ये विजेचा प्रवाह असल्याने विजेचा धक्का बसून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.


















