Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपी सीईओ स्वामींची अशीही संवेदनशीलता ; घरात दुःखाचा दिवस, त्यातही शाळांबाबत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयातून आपल्या मामांना वाहिली श्रद्धांजली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 March 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे सासरे (सख्खे मामा) नागनाथ स्वामी यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील चाकूर या राहत्या गावात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे स्वामी कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. 

अशात सर्व कुटुंबियांना दिलीप स्वामी यांनी सावरले. ते सध्या चाकुर याठिकाणी आपल्या परिवारासह थांबून आहेत. याच दरम्यान त्यांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना आणि शिक्षक चाकूरला गेले साहेबांचे सांत्वन केल्यानंतर चर्चेतून एक विषय समोर आला. राज्य शासनाने कोरोना काळात बंद असलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण न झालेले शिक्षण याचा विचार करून संपूर्ण एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र हा निर्णय घेताना शाळेची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 5 अशी ठेवण्यात आली तसा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी काढला. सध्या सोलापुरात उन्हाचा पारा वाढल्याने मार्चमध्येच तापमान 42 अंशावर गेले आहे. दुपारची शाळा यात शिक्षक विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शाळेची वेळ बदलावी अशी मागणी चर्चेतून पुढे आली. 

शिक्षण व  आरोग्य बाबत संवेदनशील असणाऱ्या दिलीप स्वामी यांनी तातडीने या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून शाळेची वेळ सकाळी साडेसात ते बारा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी आदेश काढत शाळेची वेळ ही सकाळी साडेसात ते दुपारी बारा अशी बदल केली आहे. 

घरामध्ये मामांच्या निधनामुळे संपूर्ण स्वामी कुटुंबीय दुःखात असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा त्यांच्या कामातील संवेदनशीलता दिसून आली. 

विशेष म्हणजे स्वर्गीय नागनाथ स्वामी हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक होते. आणि त्यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांबाबत घेतलेला हा निर्णय स्वर्गीय स्वामींना एकप्रकारची श्रद्धांजलीच ठरली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात आंबेडकरी नेत्यांमध्ये वाद पेटला ; ज्यांच्या डोक्यावर निळा झेंडा नाही, त्यांचे मालक वेगळे आहेत असे एजंट महामंडळात एकत्र आले

Next Post

सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभेत केली ही मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभेत केली ही मागणी

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980239
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group