मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
निर्बंधमुक्त महाराष्ट्र या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. यंदा निर्बंधमुक्त साजरा होणार गुढीपाडवा तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. याबाबतची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. सगळ्याच मंत्र्यांची अशी इच्छा होती की, राज्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावेत. त्यानुसारच आज मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता महाराष्ट्रातील निर्बंध मुक्त करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.



















