सोलापूर : क्रिकेट जगतात सोलापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सलीम खान यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले (Veteran cricketer Salim Khan, who made Solapur a national name in the world of cricket, died of a heart attack on Saturday morning.) मृत्यूसमयी त्यांचे वय 62 होते शनिवारी पहाटे चार वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला ताबडतोब त्यांना कुटुंबीयांनी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्याठिकाणी एन्जोप्लास्टी केली मात्र त्यांचे शरिराने प्रतिसाद दिला नाही.
सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा क्रिकेटर अमीर, एक मुलगी सना असा परिवार आहे. रामलाल चौकातील त्यांच्या राहत्या घरापासून निघून त्यांचा अंत्यविधी मोदी मुस्लिम स्मशानभूमी मध्ये करण्यात येणार आहे.
सलीम खान यांनी एसटीकडून तसेच महाराष्ट्र राज्याच्या invitation मॅचेस टांझानिया क्लब कडून इंग्लंड मध्ये क्लब क्रिकेट खेळले आहे. पार्क स्टेडियम उभारणीत मोठे योगदान असून, त्यांची सलीम खान स्पोर्ट्स अकॅडमी आहे वर्षभर शिबिर चालतात अनेक चांगले खेळाडू तयार केले, त्यातूनच त्यांच्या नेतृत्वात मानसी जाधव हीची राज्य स्तरावर वरिष्ठ महिला संघात त्यांची निवड झाली आहे . लंडन, दक्षिण आफ्रिका मध्ये ते जाऊन आले, प्रतिकूल परिस्थितीमधून ते पुढे आले, उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती,
पार्क मैदानावर त्यांनी मारलेला षटकार नेहरू वसतिगृहात गेल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या निधनाने जयंत दळवी, रियाज बागवान, आरिफ शेख, नौशाद नदाफ, शहनवाज काझी, चंद्रकांत रेम्बुरसु, हासीब नदाफ, शिवा अकलूजकर, मुनिर खान, कासीम चिडगूप्पी या मित्रमंडळींसह संपूर्ण सोलापूरवर तसेच क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.


















