सोलापूर : द काश्मीर फाईल चित्रपट झाल्यानंतर लक्ष्मीनारायण टॉकीज च्या बाहेर लोकांना जमवून मुस्लिम समाजाविरुद्ध तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने, धर्माच्या नावाखाली चिथावणीखोर भाषण करणाऱ्या रवी गोणे, रवी बोल्ली (रा. बापुजी नगर) व संबंधित आयोजकांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे शहर, जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 2 एप्रिल रोजी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, चित्रपट पाहून मुस्लिम समाजाविरुद्ध तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकांना रवि बोल्ली यांनी चिथावणीखोर भाषण करीत म्हणाले, आज पासून सगळेजण शपथ घेऊ की कुठल्याही मुस्लिम बरोबर व्यवहार करायचा नाही, भले रिक्षा राहूदे, भाजीपाला राहू दे ,काही पण राहू दे आज पासून त्यांना मोडून काढण्यासाठी त्यांच्यासोबत व्यवहारिक बंद करायचे आर्थिक बहिष्कार घालायचे असे भाषण करून नागरिकांना चिथावले. रवी गोणे याने भाजीपाल्यासाठी दोन रुपये जास्त गेले तरी हरकत नाही मात्र हिंदू कडूनच भाजीपाला खरेदी करा, मुस्लिम लोक आंघोळ न करता हार विकतात ,गोमास खातात, देवाला हार नाही घातले तरी चालेल मात्र हिंदू कडून घेऊ, एका महिलेने हिंदीमध्ये बोलले की बाजूला सरकायचंचे ,मराठी बोलली तरच भाजी घ्यायचे ,राशन नाही घेतले तर त्यांचे काय पोट भरता, आपल्या जिवावर ते जगतात असे चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले. हा व्हिडिओ जाणूनबुजून सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला आहे. जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल. त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करण्यवर कारवाई करा, तातडीने सलोखा न राखल्यास जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, सलमा सय्यद, रेश्मा मुल्ला, मोहसिन बागवान, रजिया शेख ,अझहर कोरबु ,मुन्ना शेख, जहीर शेख, जहिर कुरेशी ,हरीश कुरेशी, मुल्ला ,मेहबुब अली कुरेशी, कादर भागनगरी आदी उपस्थित होते.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...