Monday, May 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एकच वादळ आले अन् कासेगावची बिरोबा वस्ती उध्वस्त करून गेले ; द्राक्ष बागा झोपल्या, पत्रे गेले उडून ; हे फोटो पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 April 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : तुफानी वादळ वारे गारपीटीसह रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या वादळी वाऱ्यात कासेगाव परिसरातील घरांचे आणि शेतात उभ्या असलेल्या बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीच्या पावसाने चिखलात घातला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.

रविवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसराला वादळी वारे अन गारपिटीच्या पावसाने झोडपले. या वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिन्यांचे खांब जागोजागी तुटले, त्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा जागोजागी जमिनीवर आणि शेताच्या परिसरात लोळत असल्याचे दिसून आले.

या वादळी वारे अन् गारपिटीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपून काढले त्यात कासेगाव परिसरातील काही घरावरील पत्रे उडून गेले. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बिरोबा वस्ती परिसराला बसला. त्यात बिरोबा वस्ती वरील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने असंख्य प्रपंच उघड्यावर आले. विद्युत पोल जागोजागी तुटून पडले त्यातच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने त्यात ही विद्युत पुरवठा करणारे यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हा परिसर रविवारी रात्री अंध:कारमय झाला. या पावसात जनावरांचा चारा आणि गोट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसात भिजत असलेली आपले प्रापंचिक सामान गोळा करण्यात येईल अनेकांना मोठी कसरत करावी लागली तर काही जणांनी आज सकाळी आपल्या साहित्याची जुळवाजुळव करून जणू काल रात्री काही घडलंच नाही अशा भावनेतून नव्या उभारीने गोळा केलेले पत्रे अन् वासे एकत्रित करून पुन्हा उभारणीस प्रारंभ केल्याचे चित्र आज सकाळी दिसून आले.

रविवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीच्या पावसात द्राक्ष बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. महेश सावंत आणि अण्णा चौगुले यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून बिरोबा वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वयंपाकघरावरील पत्रे उडाल्याचे शिक्षक राजशेखर बुरकुले यांनी सांगितले.

या परिसरात विजेचे डेपो, खांब तुटून पडल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यास दोन-चार दिवसांचा अवधी लागेल असे सांगण्यात आले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : भाजप नेते सुनील कामाठी यांच्या राजकीय करिअरला आणखी एक ‘खड्डा’ ; तलवारीने तुकडे तुकडे करीन आणि फेकून देईन

Next Post

सोलापुरात महापालिका प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार ; अशी झाली फसवणूक, नागरिकांनों सावधान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात महापालिका प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार ; अशी झाली फसवणूक, नागरिकांनों सावधान

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980300
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group