सोलापूर – स्वच्छ व सुंदर शाळा मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने खुप छान काम केले आहे. राज्याला प्रेरणा देणारे काम आहे. पायाभुत सुविधाबरोबर गुणवत्ते साठी देखील चांगले काम सुरू आहे. आज शाळा प्रत्यक्ष पाहिले नंतर मला प्रचिती आली असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यांतील पापरी येथील जिल्हा परिषद शाळेस आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन स्वच्छ सुंदर शाळेची पाहणी केली. या प्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश सचिव संतोष पवार, उद्योजक अभिजीत पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गट शिक्षणाधिकारी मल्लीनाथ स्वामी, सरपंच शंकर कोळी, उपसरपंच अमोल पाटील, राजेंद्र शेळके प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व राष्ट्र्संत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करणेस आले.
या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, सोलापूर जिल्हयात जवळपास 525 कोटीचा विकास आराखडा मंजूर करणेत आला आहे. जवळपास ५ टक्के रक्कम शिक्षण विभागावर खर्च करणेचे सुचना दिले आहेत. स्वच्छ सुंदर शाळा आॅनलाईन पुरस्कार वितरण प्रसंगी मी सोलापूर जिल्ह्सात आलेनंतर शाळा पाहणार असल्याचे बोललो होतो. प्रत्यक्ष शाळेत जाऊन आज गौरव करणे साठी आलो असल्याचे सांगून वृक्षलागवड, परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, याबरोबरच गुणवत्ता सुधारणे साठी चांगले प्रयत्न केले आहेत. कोविडमुळे शिक्षणावर परिणाम झाला होता मात्र ही कसर या ठिकाणी भरून काढली आहे. सोलापूर जिल्ह्यात ८ कोटी रूपये लोकवर्गणीतून जमा होतात ही अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी विशेष प्रयत्न करून शाळांचे रूपडे पालटणेसाठी चांगले प्रयत्न केले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हा नियोजन मंडळांचे माध्यमातून शिक्षण विभागासाठी आर्थीक तरतुदींचे नियोजन करावे. माझे सोलापूर जिल्ह्यातील शाळांमधील मुला मुलींना काही कमी पडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उप मुख्यमंत्री अधिक पवार यांनी केल्या.
प्रास्तविक सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. स्वच्छ सुंदर शाळा व माजी सैनिकांसाठी राबवित असलेले उपक्रमाची माहिती दिली. स्वागत मुख्याध्यापक खताळ यांनी केले.
सुत्रसंचालन राजेंद्र सरवदे यांनी केले तर शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी आभार मानले.
माजी सैनिकांचा सत्कार ….,!
सिईओ दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून आज महाराष्ट्र दिनाचे पुर्ण संध्येला संपुर्ण जिल्ह्सात माजी सैनिकांचा गौरव होत आहे. या पार्श्वभुमीवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते मादी सैनिकांचा गौरव करणेत आला. एक दिवस माजी सैनिकांसाठी या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सिईओ स्वामी यांचे उप मुख्यमंत्री यांचे कडून कौतुक ..!
स्वच्छ व सुंदर शाळा व माजी सनिकांसाठी राबवित असलेले उपक्रमाचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. शाळांचे रूपडे पालटून टाकणेसाठी सिईओ दिलीप स्वामी व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन करून राज्यभर स्वच्छ व सुंदर शाळा राबविणेसाठी सुचना देणार असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


















