सोलापूर : शरद पवार यांच्यावरील केतकी चितळे यांच्या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ उडाला आहे. केतकी चितळे यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली.
दुपारी सदाभाऊ खोत येत सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर काही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपअध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग सहित शासकीय विश्रामगृहात घुसले, सदाभाऊ खोत ज्या रूम मध्ये बसले होते
त्या ठिकाणी त्यांनी जाऊन गोंधळ घातला… पांडुरंगा खोत यांना सद्बुद्धी दे असे म्हणून कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवले तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा समोरच निषेध नोंदवत त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. दरम्यान सदाभाऊ खोत नेमके काय म्हणाले ते पहा
















