रेशनच्या धान्याचा काळा बाजार केल्याच्या आरोपातून रेशन धान्य दुकानदार गोविंद तानाजी चोरमुले यांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती एडवोकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे.
यात हकीकत अशी आहे की दिनांक 18 ऑक्टोबर 2013 रोजी अन्नधान्य परिमंडळ अधिकारी सोपान तुकाराम पवार व त्यांचे सहकारी यांनी न्यू तेरे गाव फॉरेस्ट येथील सरकारी रास्त भाव दुकान क्रमांक 61 या दुकानाची अचानक तपासणी केली असता रेशन दुकानदार यांनी शासनाच्या युनिट प्रमाणे धान्य उचलून सदरचे धान्य रेशन कार्डधारकांना वाटप न करता काळाबाजार केल्याचे आढळून आल्याने सोपान तुकाराम पवार यांनी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने रेशन दुकानदार गोविंद तानाजी चोरमुले यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचे दोषारोपपत्र मेहरबान कोर्टात सदर बाजार पोलिसांनी दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम व्ही राठोड -पाटील यांच्या कोर्टात पूर्ण झाली सदर खटल्यांमध्ये सरकार पक्षातर्फे परिमंडळ अधिकारी तसेच पुरवठा निरीक्षक यांची साक्ष नोंदवण्यात आली होती तसेच पंचनामा फिर्यादी जबाब व तपासणी अहवाल इत्यादी कागदपत्र पुरावा म्हणून सादर करण्यात आले होते.
या खटल्याच्या अंतिम युक्तिवाद यावेळी आरोपीचे वकील एडवोकेट रियाज शेख यांनी मेहरबान न्यायालयास साक्षीदारांच्या जबाबाचे तील विसंगती तसेच फिर्याद दाखल करण्यास झालेला उशीर तसेच तपासातील उनिवा दाखवून देऊन आरोपीच्या विरुद्ध पुरेसा पूरक पुष्टी देणारा विश्वसनीय सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याची विनंती केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम व्ही पाटील-राठोड यांनी रेशन दुकानदार आरोपी नामे गोविंद चोरमुले यास निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले.


















